दिवाळीत सुरेल स्वरांची मेजवानी रंगणार सुरमयी दिपावली पहाट; सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘स्वर दीपोत्सव’

दिवाळीत सुरेल स्वरांची मेजवानी  रंगणार सुरमयी दिपावली पहाट; सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘स्वर दीपोत्सव’
Published on: 
दिवाळीत सुरेल स्वरांची मेजवानी ------- रंगणार सुरमयी दिपावली पहाट; सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आज ‘स्वर दीपोत्सव’ -- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ५ : दिवाळी म्हटले की अनेकांचे लक्ष ‘दिवाळी पहाट’कडे लागलेले असते. शहरातील वेगवेगळ्या संस्था ‘दिवाळी पहाट’ या स्वरमैफली आयोजित करण्यासाठी आता पुढाकार घेऊ लागल्या आहेत. त्यामुळेच यंदाच्या दिवाळीत शहरातील विविध ठिकाणी सुरेल स्वरांची मेजवानी उपलब्ध झाली आहे. यानिमित्ताने शास्त्रीय गायनाबरोबरच व्हायोलिन, पखवाज, शहनाई वादनही अनुभवण्याची संधी लातुरातील श्रोत्यांनी मिळाली आहे. सरस्वती संगीत कला महाविद्यालय, मराठवाडा संगीत कला अकादमी, दत्त मंदिर संस्थान, डीएस ग्रुप, रोटरी क्लब (श्रेयस), आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन, मानव संस्कृती आचार मंच, स्वरांगिनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. ६) पहाटे ५:४५ वाजता दत्त मंदिर येथे ‘सुरमयी दिपावली पहाट’ होणार आहे. यात व्हायोलिनवादक गुंजन शिरभाते (नांदेड), पखावज वादक ब्रह्मराज कांबळे (पुणे), गायक अनिरुद्ध वाघचौरे (सोलापूर) यांची संतवाणी, गायक प्रा. लक्ष्मण श्रीमंगले, पद्मजा गंदे, प्रा. शिवकुमार उरगुंडे, प्रा. विलास गारोळे, प्रा. विनोद राणे (नांदेड), प्रा. विश्वनाथ स्वामी, तुकाराम आवाड, प्रा. गणेश बोरगावकर हे कलावंत आपली सेवा रुजू करणार आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, अमृत महाराज आदी उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘स्वर दीपोत्सव’ ही मैफल आयोजित करण्यात आली आहे. यात कल्याण अपार हे शहनाई वादन तर वृषाली देशमुख हे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. हा ‘स्वर दीपोत्सव अष्टविनायक मंदिरातील गणेश हॉल येथे शुक्रवारी (ता.सहा) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. याशिवाय, अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या ‘दिवाळी पहाट’कडे असंख्य लातूरकरांचे लक्ष लागलेले असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (ता.आठ) पहाटे पाच वाजता सुरू होणाऱ्या या मैफलीत सायली टाक, शर्वरी डोंगरे, उन्नती मुंढे या लातुरातील गायिका गायन सादर करणार आहेत. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.