कापूस लिलावाचा मुहूर्त ठरला दीपावली पाडाव्याला मानवत बाजार समितीच्या आवारात लिलावाचा होणार शुभारंभ

कापूस लिलावाचा मुहूर्त ठरला   दीपावली पाडाव्याला  मानवत बाजार समितीच्या आवारात लिलावाचा होणार शुभारंभ
Published on: 
बाजार समितीत कापूस लिलावाचा ठरला मुहूर्त ---------- मानवतमध्ये दिवाळी पाडव्यास होणार खरेदीस प्रारंभ मानवत, ता. ४ (बातमीदार) : यंदाच्या कापूस हंगामातील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज यार्डात कापूस खरेदीसाठी अखेर मुहूर्त लागला असून, दिवाळी पाडव्यास दहा नोव्हेंबरपासून बाजार समिती यार्डात लिलाव सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. कापूस हंगामाचा प्रारंभ आमदार राजेश विटेकर यांच्या हस्ते होणारा असून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कापूस हंगामाची तयारी सुरू झाल्याने खरेदीसाठी लिलाव सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन नोव्हेंबरला बाजार समिती सभागृहात बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. उपसभापती नारायणराव भिसे, संचालक, वैशाली जाधव, दत्तराव जाधव, सूरज काकडे, रामेश्वर जाधव, ज्ञानेश्वर मोरे, कृष्णा शिंदे,आकाश चोखट, गजानन घाटूळ, विशाल यादव, संतोष लाडाने, मीरा मांडे, मीरा हिंगे, मीरा सुरवसे, अंबादास तुपसमुंद्रे, जुगलकिशोर काबरा, रंगनाथ वावरे उपस्थित होते. यावेळी कापसाच्या सद्यस्थितीतील असलेल्या बाजारभाव वर चर्चा झाली व लिलाव सुरू करण्यासंदर्भात तारीख निश्चित करण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाली. चर्चेअंती दीवाळी पाडव्यापासून म्हणजेच दहा नोव्हेंबरपासून बाजार समितीचा यार्डात लिलाव सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. तालुक्यातील, परिसरातील शेतकऱ्यांनी लिलाव सुरू होत असल्याने आपला कापूस परस्पर विक्री न करता यार्डात होणाऱ्या लिलावात आणून विक्री करावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. ((कोट)))) दिवाळी पाडव्याला बाजार समितीच्या यार्डात कापूस लिलावाचा प्रारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस परस्पर विक्री न करता बाजार समितीच्या यार्डात आणून लिलावद्वारे विक्री करावा. -पंकज आंबेगावकर, सभापती, कृउबा मानवत ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.