गोदाकाठावर आज रंगणार दिवाळी पाडवा पहाट

गोदाकाठावर आज
रंगणार दिवाळी पाडवा पहाट
Published on: 
((दिवाळी पहाटच्या बातमीत ही बातमी घेणे)) ---- शेतकऱ्यांना समर्पित आज ‘दिवाळी पाडवा पहाट’ ---- नांदेड, ता. ९ : शहरातील गोदावरी नदीच्या काठावरील बंदाघाट येथे मंगळवारी (ता.१०) पहाटे ५.३० ला ‘दिवाळी पाडवा पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा हा कार्यक्रम शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आला आहे. नांदेड उत्सव समिती, गुरुद्वारा बोर्ड आणि स्वरमेघ म्युझिक कल्चर यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अन्नदाता शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा संकटाच्या काळात संगीताच्या माध्यमातून शेतकऱ्यांना धीर देण्याचा आणि या संकटाचा खंबीरपणे सामना करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात संयोजक केशव घोणसे पाटील, गायिका मेघा गायकवाड, छत्रपती संभाजीनगरचे दीपक गिरी आणि शुभम गोसावी, नांदेडच्या प्रभा पत्की, अनु नितनवरे, शशिकांत जोशी हे कलाकार विविध मराठी व हिंदी गीतांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाला नांदेडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीचे डॉ. हंसराज वैद्य, इंजि. संजीवन गायकवाड, भार्गव राजे, डॉ. दत्ता मोरे, ॲड. अनिल पाटील, बालाजी इबितदार, गजानन मुधोळ, बालाजी इंगळे खानापूरकर, अतुल बुरेवार, आशुतोष घोणसे आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.