शाळांना आजपासून दिवाशाळांना आजपासून दिवाळीच्या सुट्याळीच्या सुट्या

शाळांना आजपासून दिवाशाळांना आजपासून दिवाळीच्या सुट्याळीच्या सुट्या
Published on: 
शाळांना आजपासून दिवाळीच्या सुट्या ---- १९ दिवस सुट्या; २५ नोव्हेंबरपासून शाळा नियमित होणार सुरू ---- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. ४ : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्यापासून (ता. ५) दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना ५ ते २३ नोव्हेंबरदरम्यान एकूण १९ दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने शाळा २५ नोव्हेंबरपासून नियमित सुरू होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील सुट्ट्यांचे नियोजन शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि माध्यमांच्या शाळांना दिवाळीची सुट्टी लागू राहणार आहे. विद्यार्थ्यांना दिवाळीचा सण कुटुंबीयांसमवेत साजरा करण्यासाठी तसेच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हा कालावधी मिळणार आहे. शैक्षणिक वर्षातील एकूण ३६५ दिवसांपैकी रविवार, सार्वजनिक सुट्ट्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातील सुट्ट्या, शाळा व्यवस्थापनाने घोषित केलेल्या सुट्ट्या आणि दिवाळीची सुट्टी वगळून एकूण २३७ कार्यदिवस निश्चित करण्यात आले आहेत. वर्षभरातील एकूण सुट्ट्यांची संख्या १२८ दिवस आहे. दरम्यान, दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांचा लाभ प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर वगळता इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. मात्र, या कालावधीत येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या संबंधित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू राहतील, असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शाळांचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना या नियोजनानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.