दिवाळीच्या हंगामात ''लालपरी'' सुसाट - धाराशिव विभागाला पंधरा दिवसांत १५ कोटींची कमाई

दिवाळीच्या हंगामात  ''लालपरी'' सुसाट  - धाराशिव विभागाला पंधरा दिवसांत १५ कोटींची कमाई
Published on: 
दिवाळीच्या सुट्यांमुळे ‘लालपरी’ सुसाट धाराशिव विभागाला पंधरा दिवसांत १५ कोटींची कमाई ............ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १८ ः दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत एसटी महामंडळाने केलेले नियोजन यशस्वी ठरले असून, धाराशिव विभागाने अवघ्या पंधरा दिवसांत तब्बल १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विभागातील ४०५ बसच्या माध्यमातून १४ लाख ३४ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवासाचा आनंद घेतला. विशेषतः भाऊबीजेनंतरच्या परतीच्या प्रवासात ‘लालपरी’ला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. ........ ((पॉईंटर)) उमरगा आगार अव्वल विभागातील सर्वच आगारांनी या हंगामात उत्तम कामगिरी केली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत उमरगा आगाराने अव्वल स्थान पटकावले, तर प्रवासी संख्येत कळंब आगाराने बाजी मारली आहे. - उमरगा : ८१ बसद्वारे २ लाख ७४ हजार प्रवाशांनी प्रवास केला असून, सर्वाधिक ३ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. - कळंब : ७७ बसद्वारे सर्वाधिक ३ लाख २२ हजार प्रवाशांनी प्रवास करत २ कोटी ९१ लाखांचा गल्ला जमवला. - धाराशिव : ७८ बसच्या माध्यमातून २ लाख ५७ हजार प्रवाशांकडून २ कोटी ९० लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले. - तुळजापूर : ७३ बसद्वारे २ लाख ६२ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने २ कोटी ८९ लाख ६७ हजारांची कमाई झाली. - भूम : ५९ बसद्वारे १ लाख ९८ हजार प्रवाशांमधून १ कोटी ९७ लाख ५१ हजार रुपये मिळाले. - परंडा : ३६ बसच्या माध्यमातून १ लाख २१ हजार प्रवाशांनी प्रवास करीत १ कोटी १३ लाखांचे उत्पन्न दिले. ............ परतीच्या प्रवासात ‘हाऊसफुल्ल’ दिवाळी साजरी करून कामाच्या ठिकाणी परतणाऱ्या प्रवाशांची भाऊबीज (ता. ११) ते १५ नोव्हेंबर या पाच दिवसांत मोठी गर्दी झाली होती. या काळात एसटीने ४१३ बसचे नियोजन केले होते. यातून ५ लाख ४३ हजार प्रवाशांनी प्रवास केला, ज्यामुळे अवघ्या पाच दिवसांत विभागाच्या तिजोरीत ६ कोटी रुपयांची भर पडली. एसटीच्या या अचूक नियोजनामुळे प्रवाशांची सोय झालीच, शिवाय विभागाच्या तिजोरीतही मोठी भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.