सातासमुद्रापार पोहोचतोय दिवाळीच्या फराळाचा गोडवा!

सातासमुद्रापार पोहोचतोय दिवाळीच्या फराळाचा गोडवा!
Published on: 
सातासमुद्रापार पोचतोय दिवाळीच्या फराळाचा गोडवा! धाराशिवच्या मुख्य डाकघरातून ३१ हून अधिक पार्सल रवाना; २३० देशांत पाठविण्याची सुविधा ------- धाराशिव, ता. ३ (बातमीदार) : दिवाळीच्या सणानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या आपल्या प्रियजनांना फराळ पाठविण्याची लगबग सुरू झाली आहे. भारतीय डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेला धाराशिवकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, धाराशिवच्या मुख्य डाकघरातून आतापर्यंत ३१ हून अधिक पार्सल परदेशात पाठविण्यात आले आहेत. अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये दिवाळीच्या फराळाचा गोडवा पोचविण्यात आला आहे. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीयांना आपल्या घरच्या फराळाची चव चाखता येणार आहे. दिवाळी जवळ आली की डाक विभागाकडून विविध सेवा आणि योजनांची माहिती दिली जाते. खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत किफायतशीर दर आणि विश्वासार्ह सेवेमुळे अनेक नागरिक डाक विभागाच्या सेवांना पसंती देतात. दिवाळीनिमित्त परदेशात तसेच देशांतर्गत फराळ आणि भेटवस्तू पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पार्सल सेवांना यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या प्रियजनांपर्यंत दिवाळीचा फराळ, प्रेम आणि आपुलकी पोचविण्याचे काम या सेवांच्या माध्यमातून होत आहे. धाराशिवच्या मुख्य डाकघरातून जगातील २३० हून अधिक देशांमध्ये पार्सल पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. घरच्या फराळाचा गोडवा परदेशात व्यवसाय, नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने जिल्ह्यातील अनेक नागरिक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया यांसह विविध देशांत वास्तव्यास आहेत. त्यामुळे धाराशिव शहरातील त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून परदेशात फराळ पाठविण्याची तयारी करीत आहेत. त्यातूनच आतापर्यंत ३१ हून अधिक फराळाची पार्सल परदेशात रवाना झाले आहेत. पार्सल सेवांची वैशिष्ट्ये विविध वस्तू, व्यापारी माल आणि अन्य उत्पादने योग्य पॅकिंग करून पार्सलद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध आहे. पार्सलचे किमान वजन २५० ग्रॅम, तर कमाल वजन ३५ किलो असू शकते. देशांतर्गत पार्सलच्या वितरणासाठी साधारणतः तीन ते पाच दिवस, तर आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी सहा ते बारा दिवसांचा कालावधी लागतो. धाराशिवमधून देशातील विविध ठिकाणी तसेच जगभरातील २३० हून अधिक देशांमध्ये वस्तू व व्यापारी माल ट्रॅकिंग सुविधेसह किफायतशीर दरांत पाठविता येतो. नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाकडून करण्यात आले आहे. -------- यंदाच्या दिवाळीनिमित्त धाराशिवकरांनी परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांसाठी भारतीय टपाल विभागाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत ३१ नागरिकांनी धाराशिवच्या मुख्य डाकघरातून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविला आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे." - भीमराव विजयकुमार पाटील, पोस्टमास्तर, धाराशिव मुख्य डाकघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.