Aurangabad : खासगी प्रवासी वाहतुकीच्या भाडेवाढीला आरटीओचा चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Private Bus

Aurangabad : खासगी प्रवासी वाहतुकीच्या भाडेवाढीला आरटीओचा चाप

औरंगाबाद : दिवाळीच्या अनुषंगाने खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी केलेल्या भरमसाट दरवाढीला काही प्रमाणात आरटीओ कार्यालयाने चाप लावला आहे. राज्याच्या विविध मार्गाचे अधिकतम भाडे सन २०१८ मध्ये निश्चित केलेले आहेत. त्यामुळे ठरवून दिलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडेवाढ केल्यास कारवाई करण्याचा इशारा आरटीओ कार्यालयाने दिला आहे.

दिवाळीत ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून मनमानी पद्धतीने भाडेवाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर अशा विविध मार्गावर भरमसाट भाडे आकारणी सुरु करण्यात आली आहे.

ट्रॅव्हल्सचालकांनी मूळ भाड्याच्या तीन ते चार पट अधिक भाड्याची आकारणी सुरु केल्याने प्रवासी वर्ग त्रस्त झालेला आहे. काही दिवासांपासून खासगी वाहतूकदारांच्या विरोधात तक्रारी वाढल्या आहेत. अखेर आरटीओ कार्यालयाने भाडेवाढीचा तक्ता जाहीर केला आहे. ठरवून दिलेल्या भाड्याच्या शिवाय अतिरिक्त भाडे आकारणी केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

असे आहेत भाडे (कमाल भाडे रुपयांत)

  • औरंगाबाद ते मुंबई : १८००

  • औरंगाबाद ते नागपूर : २४००

  • औरंगाबादू ते सोलापूर : १५००

  • औरंगाबाद ते लातूर : १३००

  • औरंगाबाद ते पुणे : १२००

  • औरंगाबाद ते कोल्हापूर : २२००

  • औरंगाबाद ते सांगली : २२००

  • औरंगाबाद ते चंद्रपूर : २९००

  • औरंगाबाद ते यवतमाळ : १७००

  • औरंगाबाद ते हिंगोली : ११००

खासगी वाहतूकदारांना अधिकतम भाडे गृह विभागाने ठरवून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त अधिक भाडे आकारणी केल्याची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

- संजय मैत्रेवार, प्र. प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद