व्हॉलीबॉल मैदानावर दिव्यांचा झगमगाट

व्हॉलीबॉल मैदानावर दिव्यांचा झगमगाट
Published on: 
LTR26B15627 लातूर : लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने व्हॉलीबॉल मैदानाची विधिवत पूजा करताना मान्यवर. ----- व्हॉलीबॉल मैदानावर दिव्यांचा झगमगाट --- लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनतर्फे मैदानाचे पूजन --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १४ : दिवाळीचे औचित्य साधून लातूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने व्हॉलीबॉल मैदानाची विधिवत पूजा करण्यात आली. मैदानाला दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने सजवून दिवाळीचा आनंद क्रीडांगणावरही फुलविण्यात आला. खेळाडूंच्या मेहनतीने आणि असंख्य आठवणींनी समृद्ध असलेल्या मैदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम क्रीडाप्रेमींसाठी विशेष ठरला. मैदान म्हणजे केवळ खेळण्याची जागा नव्हे, तर अनेक खेळाडूंच्या स्वप्नांना आकार देणारे व्यासपीठ! याच भावनेतून दिवाळीनिमित्ताने मैदानाचे पूजन करून त्याच्या पावित्र्याचा सन्मान करण्यात आला. मैदानावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्षवेधी ठरली. दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले क्रीडांगण आणि उत्साहाने सहभागी झालेले व्हॉलीबॉलप्रेमी यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या सोहळ्याला दत्ता सोमवंशी, विश्वजित कसले, विठ्ठल कवरे, जगन्नाथ दत्तापुरे, नाना देशमुख, पंकज पाळणे, विशाल वगरे आणि कृष्णा पोतदार यांच्यासह अन्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते. आजच्या डिजिटल युगात मोबाइल, ऑनलाइन गेम आणि स्क्रीनच्या विश्वात तरुणाई अधिकाधिक गुंतत चालली आहे. अशा परिस्थितीत मैदानाकडे वळणे ही केवळ खेळाडूंसाठीच नव्हे, तर प्रत्येक तरुणासाठी काळाची गरज बनली आहे. मैदानावर खेळल्याने शरीर सुदृढ राहते, मानसिक ताण कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि संघभावना विकसित होते. विजय स्वीकारण्याची आणि पराभवातून शिकण्याची वृत्ती मैदानच घडवते. शिस्त, सहकार्य, नेतृत्व आणि खिलाडूवृत्ती या जीवनातील महत्त्वाच्या मूल्यांची शिकवण मैदानातून मिळते. मैदानावर घालविलेला प्रत्येक क्षण हा निरोगी भविष्याची गुंतवणूक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मोबाइलच्या आभासी जगातून बाहेर पडून प्रत्यक्ष मैदानाशी नाते जोडावे, नियमित खेळावे आणि क्रीडा संस्कृती जपावी, असे विठ्ठल कवरे यांनी यावेळी सांगितले.