चोराखळी, बारूळ, येडशीत घोंगडी बैठका

चोराखळी, बारूळ, येडशीत घोंगडी बैठका
Published on: 
OSM26B07358 धाराशिव ः येडशी येथे आदिवासी बांधवाना दिवाळी फराळ वाटप करताना आमदार राणाजगजितसिंह पाटील. ---- चोराखळी, बारूळ, येडशीत घोंगडी बैठका --- आमदार राणाजगजितसिंह यांची आदिवासींसह शेतकऱ्यांसोबत दिवाळी --- धाराशिव, ता. ८ ः जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी जवळून समजून घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी चोराखळी व बारूळ येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जात दिवाळी फराळासोबत ‘घोंगडी बैठका’ घेतल्या. तसेच सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशीजवळ आदिवासी बांधवांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. पाटील यांनी शेतकरी, युवकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी समस्या, चाराटंचाई आणि इतर अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. हा संवाद केवळ सणापुरता मर्यादित नसून, संकटाच्या प्रत्येक पावलावर शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास देणारा ठरला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ------ येडशी येथे आदिवासी बांधवांसमवेत दिवाळीचा आनंद मुख्य बाजारपेठांमधील रोषणाईपेक्षा गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हाच खरा आनंद असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी येडशीजवळील आदिवासी बांधवांच्या पालावर हजेरी लावली. लहानग्यांसह कष्टकरी कुटुंबीयांसोबत त्यांनी दिवाळी फराळाचा आनंद घेतला. जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांनी अशाच उपक्रमांतून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.