Ghati Hospital Emergency Case

Ghati Hospital Emergency Case

esakal

Chh. Sambhajinagar News : किशोरवयीन मुलीने गिळली स्कार्फ पिन; अत्यंत कठीण, आव्हानात्मक शस्त्रक्रिया घाटी रुग्णालयात यशस्वी

Ghati Hospital Emergency Case : घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी १६ वर्षीय मुलीच्या श्वसनमार्गात अडकलेली तीन इंचांची धोकादायक स्कार्फ पिन यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढून तिला जीवदान दिले; कौशल्याने केलेल्या या ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रियेमुळे मोठा अनर्थ टळला असून रुग्ण आता सुखरूप आहे.
Published on

घाटी परिसर : गणेश कॉलनी येथील एक १६ वर्षीय मुलगी ड्रेस व्यवस्थित करत असताना तिने दातात स्कार्फ पिन (सेफ्टी पिन) धरली. ती चुकून श्वसनमार्गात गेल्याने गंभीर प्रसंग ओढावला. मात्र, घाटीतील कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख आणि त्यांच्या चमूने अत्यंत कौशल्याने व काळजीपूर्वक ब्रॉन्कोस्कोपीद्वारे आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून पिन बाहेर काढली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com