डॉजबॉल संघ निवड चाचणी रविवारी
छत्रपती संभाजीनगर, ता. ८ : सोलापूर जिल्ह्यातील हातुरेनगर येथील श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमध्ये १७ व १८ ऑक्टोबरला राज्य सब-ज्युनियर व ज्युनिअर मुले-मुली डॉजबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. ११) दुपारी चार वाजता एन-७, सिडको येथील रमाबाई आंबेडकर रामलीला मैदानावर निवड चाचणी होणार आहे.
सब-ज्युनियर गटासाठी १ जानेवारी २०१० नंतरची, तर ज्युनिअर गटासाठी १ जानेवारी २००८ नंतरची जन्मतारीख असलेले खेळाडू यासाठी पात्र राहतील. खेळाडूंनी वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, जन्म दाखला किंवा एसएससी प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सागर तांबे, हरी गायके व डी. आर. खैरनार यांच्या निवड समितीकडून संघाची निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी सागर तांबे (८३८१००५५०३) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त सचिव प्रा. एकनाथ साळुंके यांनी जास्तीत जास्त खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. गणेश बेटुदेसर, रेखा साळुंके, अभिजित साळुंके, रूपाली शेळके, बाजीराव भुतेकर, पांडुरंग कदम व अख्तर कुरेशी यांचे सहकार्य लाभत आहे.