
छत्रपती संभाजीनगर : त्या दोघांची फेसबुकवर ओळख झाली. प्रेमही झाले. त्यांनी नोंदणी विवाह केला. काही दिवसांत तो दारू पिऊ लागला. वाद व्हायला लागले. त्यातच त्याने गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ढिंबरगल्लीत घडली असून, महिलेच्या तक्रारीवरून पती अमोल भाऊराव दुबे (रा. ढिंबरगल्ली, बेगमपुरा) याच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.