
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी दोन डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बस डिझेलवर चालणाऱ्या होत्या. पण त्या आता ई-बसमध्ये रूपांतरित करण्याचे आदेश प्रशासकांनी मंगळवारी तीन झालेल्या आढावा बैठकीत दिले. या दोन ई-बस एप्रिल महिन्यात शहरात दाखल होणार आहेत. लवकच बसचे रूटही ठरविले जाणार आहेत.