
विद्यार्थी संख्या दुपटीने वाढवा,अन्यथा कारवाईसाठी तयार रहा; आस्तिककुमार पांडेय
औरंगाबाद : महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दुप्पटीने वाढवा, अन्यथा कारवाईसाठी तयार रहा असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी (ता. १३) महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला. प्रशासक श्री. पांडेय यांनी बुधवारी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक स्मार्ट सिटीच्या कार्यालयात घेतली. यावेळी ते म्हणाले, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शाळांचे रंगरूप पालटणार आहे. शाळा अद्ययावत व स्मार्ट होणार आहेत.
त्यामुळे शिक्षकांनी स्मार्ट व्हावे. गुणवत्ता वाढीसाठी स्वत: प्रशिक्षण घ्यावे. शाळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्यामुळे विद्यार्थी संख्या देखील दुप्पट वाढली पाहिजे. विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. सीबीएससीच्या शिक्षकांसाठी एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे, तर इंटरनेट वापरासाठी प्रत्येक शिक्षकाला दर महिन्याला पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. प्रत्येक शाळांसाठी पाच हजार रुपये शाळा अनुदान दिले जाईल असेही पांडेय यांनी स्पष्ट केले. बैठकीला स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, महापालिकेचे उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, सौरभ जोशी, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, सर्व शिक्षा अभियानाचे प्रमुख ज्ञानदेव सांगळे उपस्थित होते.
Web Title: Double The Number Of Students Municipal School Astik Kumar Pandey Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..