
छत्रपती संभाजीनगर : घाटी दवाखान्यामध्ये उपचारासाठी येणाऱ्या खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील रुग्णांना सीटी स्कॅन आणि एमआरआयच्या खर्चातील ५० टक्के आर्थिक भार जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) उचलणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दिली.