
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षेतील गैरप्रकारांवर आळा बसविण्यासाठी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी नेमलेल्या ११ पथकांनी तब्बल ११४ कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली आहे. या विद्यार्थ्यांची विद्यापीठ कायदा २०१६ नुसार कलम ३२ (पाच) नुसार समिती त्यांच्यावर पुढील कारवाई प्रस्तावित करेल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिली.