
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा वार्षिक बृहत आराखडा तयार केला. यात प्रत्येक जिल्ह्यात दोन नव्या संस्था आणि १४८ ठिकाणी नवे अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठ तसेच उपपरिसर धाराशीव येथे आठ नवे अभ्यासक्रम या आराखड्यात समाविष्ठ आहेत.