BAMU University : विद्यापीठात ‘सीईटी’ला विद्यार्थीच येईनात!;एका विषयाला केवळ एकच विद्यार्थी,प्रवेश होणार तरी कसे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३ जूनपासून विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासून काही अभ्यासक्रमांना उपलब्ध संख्येपेक्षा सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.
BAMU University
BAMU Universitysakal

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३ जूनपासून विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) सुरू झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासून काही अभ्यासक्रमांना उपलब्ध संख्येपेक्षा सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. गुरुवारी (ता. ६) तर सीईटीत काही विषयांना विद्यार्थी परीक्षा संख्या अवघी एक असल्याचे चित्र होते, तर बहुतांश विषयांना नोंदणी केलेले; परंतु अनुपस्थित राहणाऱ्यांची संख्या अधिक होती.

बामू विद्यापीठांतर्गत विविध ५५ शैक्षणिक विभाग आहेत. विभागांमध्ये ८० पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. यंदाच्या २०२४-२५ शैक्षणिक वर्षात पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘सीईटी’द्वारे प्रवेश दिला जाणार असल्याचे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले होते, त्यानुसार सीईटी नोंदणीसाठी ३० मे अंतिम तारीख देण्यात आली होती.

आज या विषयांची होणार ‘सीईटी’

शुक्रवारी विद्यापीठात पाच विषयांसाठीची प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे. यामध्ये पदव्युत्तर व्होकेशनलमध्ये ऑटोमोबाइल, इंडस्ट्रीयल ऑटोमेशन, ग्रंथालय व माहितीशास्त्र, एम.ए. अर्थशास्त्र, पर्यटन आणि पर्यटन व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश आहे. ही सीईटी सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत विषयानुसार होणार आहे.

दोन टप्प्यांत परीक्षा

विविध अभ्यासक्रमांसाठीची ‘सीईटी’ ३ जूनपासून सुरू झाली. परीक्षेचे दोन टप्पे झाले. गुरुवारीही विविध १८ विषयांसाठी ‘सीईटी’ घेण्यात आली. विषयनिहाय विविध सत्रांत परीक्षा घेण्यात आली. यात काही विषयांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य परिसरातील विभागांमध्ये, तर काही विषयांसाठी धाराशिव उपपरिसरात परीक्षा घेण्यात आली.

संगीत, पाली बुद्धिझमला केवळ एकच विद्यार्थी

विद्यापीठात गुरुवारी एम.कॉम., पाली ॲण्ड बुद्धिझम, एम.एस्सी. ॲनालिटिकल केमिस्ट्री, एम.एस्सी. केमिस्ट्री, संस्कृत, एम.एस्सी. मॅथेमॅटिक्स यांसारख्या विविध १८ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मात्र, पाली ॲण्ड बुद्धिझम आणि एम.ए. संगीत या विषयांना केवळ एक-एक परीक्षार्थीनेच उपस्थिती लावली. याशिवाय गणित, एमआयबी, रसायनशास्त्र या विषयांना उपस्थिती अधिक होती. गुरुवारी ८३९ पैकी ५८६ विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी दिल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com