पान १ अँकर ः स्वतःच्या फळबागेपेक्षा तहानलेल्या जीवांची चिंता!

पान १ अँकर ः स्वतःच्या फळबागेपेक्षा तहानलेल्या जीवांची चिंता!
Published on: 
पान १ फ्लायर - पासपोर्ट फोटो घ्यावा ((ABD26J81561 ः डॉ. गणेश पाचपिल्ले)) ----- दुष्काळात गावांसाठी विहीर, कूपनलिकेचे पाणी खुले ---- स्वतःची फळबाग धोक्यात घालून सुकळीच्या डॉ. पाचपिल्ले यांचा पुढाकार ---- संजय सोनी सेनगाव, ता. १७ : पावसाच्या खंडामुळे स्वतःची फळबाग जगविण्याचे आव्हान उभे ठाकलेले असताना, सुकळी बुद्रुक (ता. सेनगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश पाचपिल्ले यांनी समाजाची तहान भागविण्यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, आपल्या शेतातील विहीर व कूपनलिकेचे पाणी टंचाईग्रस्त गावांतील नागरिक, पशुधन तसेच सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी विनामूल्य देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन देऊन आवश्यक नियोजनाची विनंती केली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील जलस्रोतांची पातळी खालावली असून, रब्बीसह आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. शेतातील पाणी उपसल्यास स्वतःच्या फळबागेवर परिणाम होण्याची शक्यता असतानाही, डॉ. पाचपिल्ले यांनी मुक्या जनावरांची व नागरिकांची तहान भागविण्याला प्राधान्य दिले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा समतोल राखून हे पाणी वितरित केले जाईल. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन तहसील कार्यालय, पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी समन्वय साधून गरजू गावांची निश्चिती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता अशा सामाजिक सहभागातून टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. ---- पाणी मोफत; पण वाहतुकीचा खर्च सेनगाव तालुक्यातील कोणत्याही गावात सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रम अथवा तीव्र टंचाई असल्यास डॉ. पाचपिल्ले पाणी मोफत उपलब्ध करून देतील. मात्र, विहिरीवरून पाणी गावापर्यंत किंवा कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी लागणाऱ्या टँकर व वाहतुकीचा खर्च संबंधित ग्रामस्थ किंवा आयोजकांना करावा लागणार आहे. --- सामाजिक कार्याची परंपरा डॉ. पाचपिल्ले यांच्या सामाजिक बांधिलकीला जुनी पार्श्वभूमी आहे. २०१२-१३ मध्ये सेनगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीवरून सेनगाव शहरासाठी दररोज तब्बल पाच टँकर पाणी विनामूल्य पुरवून नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. आता पुन्हा एकदा संकटाच्या काळात ते धावून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com