Mephedrone Drug Case : मुख्य आरोपी गोंधळेकरसह पगार याची तुरुंगात रवानगी

आरोपी सौरभ आणि शेखर याला सुरवातीला ‘डीआरआय’च्या पथकाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. मुसळे यांच्या न्यायालयासमोर हजर केले
dri action chhatrapati sambhajinagar mephedrone drug case accused gondhale and pagar sentence jail
dri action chhatrapati sambhajinagar mephedrone drug case accused gondhale and pagar sentence jailesakal

छत्रपती संभाजीनगर : पैठण औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या गोदामात तब्बल १६० कोटींचे मॅफेड्रोन सापडल्याप्रकरणात कंपनीच्या संचालकासह गोदाम व्यवस्थापकाला केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने अटक केली.

या दोघांना सोमवारी (ता.३०) न्यायालयात हजर करण्यात आले असता, अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी दोघा आरोपींना चार नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोघांचा मुक्काम हर्सूल कारागृहात हलविण्यात आला.

समाजात बडे प्रस्थ असलेल्या सौरभ गोंधळेकर याची पैठण औद्योगिक वसाहतीत ॲपेक्स मेडीकेम नावाची कंपनी आहे. या कंपनीत ड्रग्जसाठा असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन २८ आणि २९ ऑक्टोंबर या दोन दिवसांच्या कारवाई सदर ड्रग्ज जप्त करत दोघांना अटक केली.

दोन वेळेस दोन न्यायालयात हजर

आरोपी सौरभ आणि शेखर याला सुरवातीला ‘डीआरआय’च्या पथकाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. मुसळे यांच्या न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मोमीन यांच्या समोर हजर करण्यात आले. न्यायाधीश श्री. मोमीन यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

जीतेशकुमारचा जबाब नोंदवा ः डीआरआय

या कारवाईच्या आठ ते नऊ दिवसांपूर्वी ‘डीआरआय’च्या पथकाने पैठण औद्योगिक वसाहतीत जितेशकुमार हिनोरिया आणि आरोपी संदीप कुमावत या दोघांना २५० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. अटकेतील आरोपी जितेशकुमार याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला तत्काळ न्यायालयात हजर करता आले नव्हते, याच जितेशकुमारचा जबाब नोंदविण्यासाठी ‘डीआरआय’ने आता सोमवारी न्यायलयात अर्ज केला आरोपी सौरभ म्हणे, ‘सर्जिकल पिलो’ द्या आरोपी सौरभ गोंधळेकर याला मणक्याचा त्रास असल्याने त्याला न्यायालयीन कोठडीत सर्जिकल पीलो देण्यात यावी, यासाठी आरोपीच्या वकीलांमार्फत न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर केल्याने आता आरोपी गोंधळेकर याला कोठडीत ही सुविधा देण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com