BAMU Speeds Up Exam Fee Waiver Process for Students from Drought-Affected Talukas
esakal
खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. सोमवारी (ता. १९) दुपारी चारपर्यंत शून्य टॅबद्वारे ७,५०० विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जांची नोंद झाली. रात्रीपर्यंत हा आकडा १०,५०० पर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट विद्यापीठाने ठेवले आहे.