दुष्काळ जाहीर करा,मनसेचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

दुष्काळ जाहीर करा,मनसेचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
Published on
दुष्काळ जाहीर करा,मनसेचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गंगापूर बातमीदार ता.२२ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत व कर्जमाफी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे .मनसेचे जिल्हा संघटक अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिके करपून गेली असून पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. काही तालुके दुष्काळातून वंचित राहिल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पूर्ण दुष्काळ जाहीर करावा.बाधित शेतकऱ्यांना विनाअट हेक्टरी भरीव आर्थिक मदत थेट खात्यावर जमा करावी,कोणताही भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, पीक विम्याची भरपाई तात्काळ आणि विनाअट वितरित करावी,पिण्याच्या पाण्याचे टँकर, चारा छावण्या व रोहयोची कामे तात्काळ सुरू करावीत,शेतीची वीज जोडणी खंडित करणे थांबवून महसूल वसुलीला स्थगिती द्यावी अशा विविध मागण्या करण्यात आले आहे.मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालयांवर ''घंटा बजाव'', ''ढोल बजाव'' व ''शंखनाद'' आंदोलन छेडण्याचा इशारा अशोक पवार यांनी दिला आहे. निवेदनावर अशोक कराळे, बाळासाहेब बोजवारे, गफूर पटेल, विठ्ठल बनकर, राजू बनकर, मुकेश मालोदे, लहू गायकवाड, भागिनाथ मालोदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. फोटो ओळ : दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अशोक पवार,अशोक कराळे बाळासाहेब बोजवारे आदी पदाधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com