शाखाधिकारी नाही, पीक कर्जाच्या फाईली तुंबल्या!

शाखाधिकारी नाही, पीक कर्जाच्या फाईली तुंबल्या!
Published on: 
दुष्काळाच्या झळा, त्यात बँकेच्या चकरा! बँकेतील रिक्त पदाचा फटका; शेतकऱ्यांचे हेलपाटे कळंब, ता. १३ (बातमीदार) : एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, दुसरीकडे पीक कर्जासाठी बँकेच्या चकरा मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कळंब शाखाधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर नवीन शाखाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली; मात्र ते वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, शाखाधिकाऱ्यांअभावी शेकडो शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या फायली रखडल्या आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्ज प्रकरणांवर निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींसह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कर्जासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटले असून, आगामी हंगामाचे नियोजन आणि दैनंदिन खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. अशा परिस्थितीत पीक कर्ज हा मोठा आधार ठरतो. मात्र, कळंब शाखेत शाखाधिकारी उपलब्ध नसल्याने कर्जप्रकरणे पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे. आपल्या कर्जप्रकरणाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकरी वारंवार बँकेत चकरा मारत आहेत; मात्र प्रत्येक वेळी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. शाखाधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नवीन अधिकारी रुजू होईपर्यंत प्रभारी अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपविणे अपेक्षित असताना, प्रशासकीय विलंबाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वरिष्ठ बँक प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून प्रलंबित पीक कर्ज प्रकरणांचा निपटारा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. ............................ ((कोट)) शाखाधिकाऱ्याची बदली झाली असून, बँक व्यवस्थापनाने नवीन शाखाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. दोन दिवसांत ते कळंब शाखेचा पदभार स्वीकारतील. - एम.व्ही. कांबळे, सहायक शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Crop Loan Update
Wardha Kharif Crop Loan
Solapur DCC Bank Loan : ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या कर्जाची चौकशी करावी  अॅड. दिपक पवार यांची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत मागणी
Farmer Agitation in Lohara
Marathi News Esakal
www.esakal.com