दुष्काळजन्य परिस्थितीचा रब्बी पेरण्यांना मोठा फटका जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणी प्रचंड घटली, नऊ टक्केच पेरणी

दुष्काळजन्य परिस्थितीचा  रब्बी पेरण्यांना मोठा फटका जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या तुलनेत पेरणी प्रचंड घटली, नऊ टक्केच पेरणी
Published on: 
दुष्काळजन्य परिस्थितीचा रब्बी पेरण्यांना मोठा फटका जिल्ह्यात पेरणी क्षेत्रात घट, नऊ टक्केच पेरणी सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ५ : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र ४ लाख १७ हजार हेक्टर इतके आहे. मात्र, यंदाच्या खरीप व रब्बी हंगामात तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम रब्बीच्या पेरण्यांवर झाला. जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी पेरणी झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात रब्बीच्या एकूण केवळ ३७ हजार ९४४ हेक्टर क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात पडलेला तुटपुंजा पाऊस, भूजल पातळीत झालेली तीव्र घट आणि सिंचनाचे उपलब्ध स्रोत आटल्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी ओलावा किंवा पाण्याची उपलब्धता राहिलेली नाही. रब्बीचा मुख्य आधार असलेल्या ज्वारी आणि हरभऱ्यासारख्या पिकांच्या पेरण्याही अपुऱ्या पाणी उपलब्धतेमुळे रखडल्या आहेत. ४ लाख १७ हजार हेक्टरच्या तुलनेत केवळ ३७ हजार हेक्टरहून थोडे अधिक क्षेत्र पेरणीखाली येणे हे शेतकरी किती मोठ्या संकटात सापडले आहेत, याची साक्ष देते. ....... ((पॉईँटर)) कोणत्या पिकाची किती पेरणी झाली? ज्वारी : २५ हजार ३५२ हेक्टर हरभरा : ११ हजार ७४१ हेक्टर गहू : १ हजार १४२ हेक्टर करडई : ६२६ हेक्टर इतर तृणधान्ये: १३१ हेक्टर इतर कडधान्ये: १२२ हेक्टर इतर गळीत धान्ये: ३ हेक्टर ऊस : १६ हजार ३९६ हेक्टर मका, तीळ, व सूर्यफूल: ०.० हेक्टर ......... ((पॉईँटर)) पेरण्या घटीचे संभाव्य परिणाम - रब्बी हंगाम हा या भागातील शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा मानला जातो. उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणार नाही. परिणामी, ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात येण्याची शक्यता आहे. - ज्वारी आणि कडधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे आगामी काळात ज्वारीची टंचाई भासण्याची शक्यता आहे. - ज्वारीचा कडबा हा जनावरांच्या चाऱ्याचा मुख्य स्रोत आहे. पण, तुटपुंज्या पेरण्यांमुळे कडबा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होणार असून, त्यामुळे चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. - शेतातून उत्पन्न मिळण्याची चिन्हे नसल्याने संसाराचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आर्थिक ओढाताण वाढू शकते. तसेच मजुरीच्या कामांची मागणी वाढू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.