जिल्हा परिषदेत कार्यशाळा

जिल्हा परिषदेत कार्यशाळा
Published on: 
शेतकरी, नागरिकांना द्या मानसिक आधार धाराशिव, ता. ११ (बातमीदार) : दुष्काळामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, शेतकरी व नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय आणि हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने ‘दुष्काळातील ताण-तणावाशी सामना’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित बनसोडे यांच्यासह गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, संयम व आपलेपणा जपावा. दुष्काळ ही केवळ अन्न व पाणीटंचाईची समस्या नसून त्याचे मानसिक आणि सामाजिक परिणामही होतात. त्यामुळे महसूल, आरोग्य आणि अन्य विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना आवश्यक मदत व मार्गदर्शन द्यावे. म्हाडदळकर म्हणाल्या, आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांशी आपुलकीने संवाद साधावा. त्यांच्या अडचणी, मानसिक स्थिती आणि भावनिक गरजा समजून घ्याव्यात. तणावग्रस्त व्यक्तींना सकारात्मक उपक्रमांत सहभागी करून घेण्याबरोबरच सामाजिक आधार वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. आशिष येपुरे आणि डॉ. महेश कानडे यांनी दुष्काळामुळे निर्माण होणारा मानसिक ताण, चिंता, नैराश्य, व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद, एकटेपणा आणि आत्महत्येचा धोका याबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com