Crime News : संतापजनक! निर्दयी बापाने पोटच्या मुलांना फेकलं विहिरीत; एकाचा मृत्यू

एका मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला
Crime News
Crime NewsEsakal

छत्रपती संभाजीनगर येथील चिकल ठाण्यातील चौधरी कॉलनीमध्ये शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत निर्दयी बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. यात एका मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं मात्र एकाचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

एमआयडीसी सिडको ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रेयस राजू भोसले (वय 7 वर्षे) असे मृत मुलाचे असून शिवम राजू भोसले (वय 9 वर्षे) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. तसेच राजू प्रकाश भोसले (वय 33 वर्षे) असे निर्दयी बापाचे नाव आहे.

Crime News
Amit Shah: अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू भोसले हा छत्रपती संभाजीनगर शहरातील चौधरी कॉलनीत आई, वडील व दोन मुलांसह राहतो. तो वेल्डींगची कामे करतो. मात्र राजूला दारूचे व्यसन लागले. राजू दारू पिण्यामुळे त्याचे पत्नीसोबत वाद होऊ लागले. रोजच्या त्रासाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी राजूची पत्नी माहेरी निघून गेली. दोन्ही मुलं राजूकडेच होती. काल (शुक्रवारी) रात्री आठ वाजेच्या सुमारास राजू दारू पिऊन घरी आला. त्यानंतर घरापासून 200 मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना घेऊन गेला आणि दोन्ही मुलांना विहिरीत फेकून देऊन घरी परत आला.

Crime News
Nitesh Rane: संजय राऊतांचं प्राणीप्रेम विशेष ! नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली

दारूच्या नशेत टोकाचे पाऊल उचलत आपल्या नऊ आणि सात वर्षांच्या मुलांना सोबत घेऊन घरापासून जवळच असलेल्या विहिरीत ढकलून दिलं. यात सात वर्षीय श्रेयस राजू भोसले याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर शिवम राजू भोसले याला वाचविण्यात स्थानिकांना यश आलं.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान एका मुलाला बाहेर काढल्यावर दुसरा मुलगा मात्र सापडत नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या शोध कार्यानंतर पाण्यात बुडालेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश आले, पण त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Crime News
Amit Shah: अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com