परभणीत ११ ऑक्टोबरपासून श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ

परभणीत ११ ऑक्टोबरपासून श्री दुर्गामाता दौडीला प्रारंभ
Published on: 
परभणीत उद्यापासून श्री दुर्गामाता दौड ------ नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध भागांत आयोजन ---- सकाळ वृत्तसेवा परभणी, ता. ९ ः शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शहरात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. ११) पासून या उपक्रमास प्रारंभ होणार असून, नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत शहरातील विविध भागांत रोज सकाळी सहाला दौड काढण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. २०) विजयादशमीच्या दिवशी प्रभावतीनगरीतील श्री अष्टभुजा देवी मंदिर येथे सकाळी सातला महादौड होणार असून, त्यानंतर या उपक्रमाची सांगता होईल. पहिली दौड रविवारी गांधी पार्क येथे होईल. सोमवारी (ता. १२) श्री गणपती चौक, जिंतूर रोड येथे दुसरी, तर मंगळवारी (ता. १३) श्री स्वामी समर्थ केंद्र, सिंचननगर येथे तिसरी दौड काढण्यात येणार आहे. बुधवारी (ता. १४) श्री सद्‍गुरूनगर मैदान, जुना पेडगाव रोड येथे चौथी, तर गुरुवारी (ता. १५) देशमुख हॉटेल, कारेगाव रोड येथे पाचवी दौड होईल. शुक्रवारी (ता. १६) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कमान, जिंतूर रोड येथे सहावी दौड आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी (ता. १७) श्री चिंतामणी महाराज मंदिर, वसमत रोड येथे सातवी, रविवारी (ता. १८) श्री व्यंकटेश (बालाजी) मंदिर, ममतानगर येथे आठवी, तर सोमवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष रोड येथे नववी दौड होणार आहे. या सर्व दौडी सकाळी सहाला सुरू होतील. --- विजयादशमीला महादौड विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी (ता. २०) सकाळी सातला श्री अष्टभुजा देवी मंदिर, प्रभावतीनगरी येथे महादौडीचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दौडीचा समारोप होणार आहे. श्री दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून धर्म, संस्कार, शिस्त, सामाजिक एकोपा, राष्ट्रभक्तीचा संदेश समाजात पोचविण्याचा प्रयत्न केला जातो. भगव्या ध्वजासह, जयघोषात निघणाऱ्या या दौडीत तरुण-तरुणी, महिला, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, परभणी विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com