खरिपातील ई-पीक पाहणीचे मंजुरीचे काम रेंगाळलेलेच

खरिपातील ई-पीक पाहणीचे मंजुरीचे काम रेंगाळलेलेच
Published on: 
खरिपातील ई-पीक पाहणीचे मंजुरीचे काम रेंगाळलेलेच --- - अद्यापही १९ टक्के पाहणी बाकी, ८१ टक्के काम पूर्ण - पाहणीत लोहारा, उमरगा, तुळजापूर तालुके आघाडीवर ------ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २८ ः खरीप हंगाम २०२६ मधील पिकांची जिल्ह्यातील १९ टक्के ‘ई-पीक पाहणी’चे अद्यापही रखडलेले आहे. ही ई-पीक पाहणी पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. बुधवार (ता. २८) पर्यंत जिल्ह्यात एकूण ८०.९३ टक्के काम पूर्ण झाले असून, यामध्ये लोहारा, उमरगा आणि वाशी तालुक्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील एकूण आठ लाख ५९ हजार २० पैकी सहा लाख ८३ हजार ३२७ प्लॉटची ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. ४८ हजार २७३ पैकी ४१ हजार ६९४ (८६.३७ टक्के) सर्वेक्षणांचे काम पूर्ण करून लोहारा तालुका जिल्ह्यात अव्वलस्थानी राहिला आहे. उमरगा तालुक्यात ८५.५८ टक्के, तर वाशी तालुक्यात ८३.९८ टक्के कामकाज झाले असून, येथील मंजुरीची टक्केवारीही ९१ टक्क्यांच्या वर आहे. कळंब तालुक्यात एक लाख सात हजार ४९० (८३.६५ टक्के) पाहण्या पूर्ण झाल्या असून, ९०.७३ टक्के पाहण्यांना मंजुरी मिळाली आहे. याशिवाय तुळजापूर तालुक्यात ७९.०१ टक्के प्लॉटवर अंतिम मंजुरी मिळविण्यात यश आले असून, येथील एकूण पाहणी ८२.९३ टक्के झाली आहे. ---- धाराशिव व परंडा तालुक्यात अजून गतीची गरज जिल्ह्यात एकूण ८० टक्क्यांहून अधिक ई-पीक पाहणीचे काम पूर्ण झालेले असले, तरी धाराशिव (७२.८७ टक्के) आणि परंडा (७५.१७ टक्के) तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाची टक्केवारी इतर तालुक्यांच्या तुलनेत काहीशी मागे आहे. धाराशिव तालुक्यात ४८.१२ टक्के, तर परंडा तालुक्यात ५६.०२ टक्के एकूण प्लॉट्सना अंतिम मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये उर्वरित कामकाज वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. ------ शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा जिल्ह्यात एकूण दोन हजार १२९ सक्रिय सर्वेक्षक या मोहिमेत कार्यरत आहेत. सर्वेक्षकांनी पूर्ण केलेल्या सहा लाख ५७ हजार १९० पाहण्यांव्यतिरिक्त तब्बल २६ हजार १३७ पाहण्या थेट शेतकऱ्यांनी स्वतःहून केल्या आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पिकांची अचूक नोंद राहण्यासाठी शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आपली ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com