गंगापूर तालुक्यात ई-पीक पाहणी ४२.६३ टक्क्यांवर, ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीत घट.

गंगापूर तालुक्यात ई-पीक पाहणी ४२.६३ टक्क्यांवर, ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीत घट.
Published on: 
गंगापूर ः ई-पीक पाहणीची किचकट प्रक्रिया व ॲपमधील विविध तांत्रिक अडचणींमुळे गंगापूर तालुक्यातील ई-पीक पाहणीचे काम संथ गतीने सुरू असून आतापर्यंत केवळ ४२.६३ टक्केच पाहणी पूर्ण झाली आहे. एकीकडे पावसाच्या दीर्घ खंडामुळे तालुक्यातील बहुतांशी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे, तर दुसरीकडे ई-पीक पाहणीतील अडथळ्यांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असल्याने वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.शासनाने सुरुवातीला ई-पीक पाहणीची जबाबदारी नियुक्त सहाय्यकांना दिली होती.वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्या, एकाच गटात अनेक शेतकरी असणे आणि अनेक गटांचे लोकेशन प्रत्यक्ष ठिकाणाऐवजी दुसरीकडेच दाखवणे अशा अडचणींमुळे सहाय्यकांची प्रचंड दमछाक झाली. प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्येक पिकाचे तीन लाईव्ह फोटो अपडेट करावे लागत आहेत. त्यातच ॲपमध्ये वारंवार होणारे बदल व सुधारणांमुळे ही प्रक्रिया किचकट बनली असून यामुळे नोंदणीची टक्केवारी घसरली आहे.खरीप हंगामातील ई-पीक पाहणीसाठी राज्यात ११ ऑगस्टपासून शेतकरी स्तरावर डीसीएसएमएच मोबाईल ॲपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ॲपमधील किचकट प्रक्रिया आणि माहिती भरण्याबाबत माहिती नसल्याने अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी लॉगिनवर सुविधा असूनही अनेक शेतकऱ्यांना सहाय्यकांवरच अवलंबून राहावे लागत आहे. ई-पीक पाहणीची ही नोंद सातबारा उताऱ्यावरील पीक पेऱ्यात होणार असून, पीक विमा आणि शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.डिजिटल पीक पाहणी अहवालानुसार ३ ऑक्टोबरपर्यंत गंगापूर तालुक्यात ४२.६३ टक्के पाहणी पूर्ण झाली आहे.पीक विम्याचा लाभ व इतर शासकीय योजनांपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी सहाय्यकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली ई-पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com