विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक
गणेशोत्सवाचा दिला संदेश
श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये बनविल्या मातीपासून मूर्ती
सकाळ वृत्तसेवा ः
धाराशिव, ता. १३ ः गणेशोत्सवाचे औचित्य साधून शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा झाली. इयत्ता पाचवीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवत सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.
या कार्यशाळेत संस्कार भारती (धाराशिव समिती)च्या अंजली शेटे-विळेगावे यांनी विद्यार्थ्यांना मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व मोफत प्रशिक्षण दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको-फ्रेंडली मूर्तींचे कौतुक करीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.
प्रारंभी, प्रशिक्षक शेटे-विळेगावे यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, कार्यशाळा प्रमुख व्ही.एल. पवार व पर्यवेक्षक शेषनाथ वाघ यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य संतोष घार्गे, कैलास कोरके, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षिका बी.बी. गुंड, पर्यवेक्षक के.के. पाटील, बी.एम. गोरे व कलाध्यापक शिवाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
........
धाराशिव ः श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करताना विद्यार्थिनी. यावेळी उपस्थित शिक्षक आदी.
फोटो क्रमांक ः OSM26B06976