
छत्रपती संभाजीनगर : मागील वर्षी दिवाळीपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ होत आहे. त्यात सर्वाधिक वाढ करडईच्या तेलात होत असल्याचे दिसून आले. त्यानुसार २८० रुपयांचे असलेले करडी तेलाचे दर प्रतिलिटर ३० रुपये वाढले आहेत. त्यामुळे हे दर ३१० रुपये झाले आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक वापरले जाणारे पामतेल ८ रुपयांनी प्रतिलिटरमागे वाढले असल्याचे दिसून आले.