जि.प.प्राथमिक शाळेत अगरकानडगाव येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

जि.प.प्राथमिक शाळेत अगरकानडगाव येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.
Published on: 
शिक्षण परिषदेत तज्ज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन गंगापूर, ता. २२ (बातमीदार) : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, अध्यापन पद्धतीतील सुधारणा आणि नवीन शैक्षणिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाने जामगाव केंद्राची शिक्षण परिषद जि.प. उच्च प्राथमिक शाळा, अगरकानडगाव येथे नुकतीच केंद्रप्रमुख अजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या परिषदेत प्रामुख्याने ‘मूल्यवर्धन शिक्षण’ या संकल्पनेवर सखोल विचारमंथन करण्यात आले. मुख्याध्यापक हंसराज काळे यांनी प्रास्ताविक केले. उपक्रम शिक्षक विलास निकम यांनी मूल्यवर्धन व क्षमता विकसनावर, तर शिक्षक नितीन जाधव यांनी प्रत्यक्ष सहभागातून ‘वर्ग नियम तयार करणे व त्याचे परिणाम’ या विषयावर प्रात्यक्षिक दाखवले. पदवीधर शिक्षक कडूबा हारदे यांनी ‘जोडी चर्चा व सहयोगी अध्ययन’ यावर सराव घेतला. मूल्यवर्धन समन्वयक अजित पवार यांनी दैनंदिन जीवनातील मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले. केंद्रप्रमुख अजित तांबे यांनी शाळा स्तरावर मूल्यशिक्षण उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक प्रसाद शिंगारे, राजाभाऊ क्षीरसागर, तिलकेश्वर शिरसाठ, अजित राजळे, सखाराम ठाणगे, कैलास सांगळे, मनीषा लोखंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप काळे यांनी केले. सुनीता अकोलकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com