शिक्षकांविना ९५ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; उमरदमध्ये आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास बीडमध्ये प्रवेशाचा इशारा

शिक्षकांविना ९५ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला;  उमरदमध्ये आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास बीडमध्ये प्रवेशाचा इशारा
Published on: 
शिक्षकांविना ९५ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला बीड, ता. ५ (बातमीदार) ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या शासकीय दाव्यांना प्रशासकीय ढिसाळपणामुळे कसा हरताळ फासला जातो, याचे ज्वलंत उदाहरण बीड तालुक्यातील उमरद (खा.) येथे समोर आले आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाअभावी तब्बल ९५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शाळेतील शिक्षक शिवाजी जोगदंड यांची २९ सप्टेंबर रोजी हिवरा पहाडी येथे बदली झाली. मात्र, त्यांच्या बदलीनंतर शिक्षण विभागाने या शाळेत पर्यायी शिक्षकाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. शैक्षणिक वर्ष महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच मुख्य विषयांचे अध्यापन ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना तातडीने निवेदन देण्यात आले आहे. केवळ बदल्यांचे आदेश काढून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही; रिक्त पदावर तत्काळ नियुक्ती करणे गरजेचे आहे. येत्या आठ दिवसांत गणित व विज्ञानासाठी कायमस्वरूपी किंवा पर्यायी शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास, उमरद येथील २५ विद्यार्थ्यांना थेट बीड शहरातील इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश देण्याचा आक्रमक इशारा संतप्त पालकांनी दिला आहे. आता शिक्षण विभाग यावर काय कार्यवाही करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com