

छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा ‘अपार’ आयडीचा आदेश काढला. त्यानंतर पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांसह पालकांचे आधार कार्ड गोळा करीत अपार आयडीच्या कामाला लागले. जिल्ह्यात आतापर्यंत ५२ टक्के विद्यार्थ्यांना अपार आयडी देण्यात आले.