School Uniform Issuesakal
छत्रपती संभाजीनगर
School Uniform Issue : शिक्षण खात्याने दिली ढगळ चड्डी! नुसत्या चिंध्या जोडून विद्यार्थ्यांची चेष्टा; काहींचे लहान, काहींचे खिसे भलतीकडेच
शासनाने विद्यार्थ्यांच्या गणवेशाची अक्षरशः चेष्टा चालवली आहे. निम्मं शैक्षणिक वर्ष संपले तरी गणवेश मिळाले नाही. तसेच आता काही शाळांमध्ये गणवेश वाटपाला सुरवात झाली.
छत्रपती संभाजीनगर - शासनाने विद्यार्थ्यांच्या गणवेशाची अक्षरशः चेष्टा चालवली आहे. निम्मं शैक्षणिक वर्ष संपले तरी गणवेश मिळाले नाही. तसेच आता काही शाळांमध्ये गणवेश वाटपाला सुरवात झाली. मात्र, हे गणवेश पाहिल्यावर असे वाटते गणवेश शिवलाय की चिंध्या जोडल्या. त्यात काहींना ते ढगळ, काहींना लहान, काहींना तिरप्या खिशांचे गणवेश मिळाले. गणवेशाची अवस्था बघून चीड आल्याशिवाय राहणार नाही.
