Maharashtra TET Final Answer Key 2025
esakal
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेची अंतिम उत्तरसूची अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात (Maharashtra TET 2025 Final Answer Key) आली आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ही अंतिम उत्तरसूची उपलब्ध करून देण्यात आली असून, परीक्षेचा अंतिम निकाल यथावकाश जाहीर केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त डॉ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.