esakal | शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न ; अब्दुल सत्तार
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न ; अब्दुल सत्तार

sakal_logo
By
तेजस भागवत

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवुन देण्यास प्रयत्न करणार असल्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. चार) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांचे नुकसान, जीवतहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश गटणे, पोलिस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल उपस्थित होते. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रस्ते, पूल यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा प्रस्ताव देखील सादर करावा. तसेच मुख्य रस्त्यांच्या बाजुला झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची कार्यवाही करावी.

loading image
go to top