
समर्थनगर : परिसरातील सावरकर चौकाजवळ एका कारचालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांचा बुधवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचला उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी साडेबाराला घडला. याप्रकरणी निष्काळजीपणे कार थांबवणाऱ्या कारचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला.