Animal Attack: कन्नड तालुक्यातील पळसखेडा गावात बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Wildlife Attack: कन्नड तालुक्यातील पळसखेडा येथे एका वृद्ध व्यक्तीवर रात्री हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अधिक तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
कन्नड : तालुक्यातील पळसखेडा येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. सुभाष लक्ष्मण काकडे (वय ६५) असे त्यांचे नाव आहे.