
गंगापूर : तालुक्यातील ढोरेगाव येथील महामार्गावर फिरणाऱ्या आजीला तरुणांनी रस्त्याच्या बाजूला सोडले. परंतु, ती पुन्हा-पुन्हा रस्त्यावर येत होती. तिला नाव, गाव विचारले असता सांगता येत नव्हते. तरुणांनी ही माहिती सोशल मीडियावरील काही ग्रुपवर टाकली. माहिती नातेवाइकांना मिळताच आजीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.