
छत्रपती संभाजीनगर : शहानूरमियाँ दर्गा रस्त्यावरून जवाहरनगरकडे दुचाकीवर येत असताना एका इलेक्ट्रिशियनचा गळा नायलॉन मांजाने कापला गेला. मानेपासून ते गळ्यापर्यंत तब्बल दहा सेंटिमीटर लांब आणि खोलपर्यंत झालेल्या जखमेत गळ्याच्या नाजूक नलिका बालंबाल बचावल्या. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. पांडुरंग कांतीलाल पाटकुले (वय ३०, रा. कैलासनगर, गल्ली नंबर २ पूर्व) असे जखमीचे नाव आहे.