esakal | औरंगाबादेत वीजबिल वसुली जोरात
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad

औरंगाबादेत वीजबिल वसुली जोरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महावितरणकडून थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीज बिल वसुली करताना कर्मचाऱ्यांना विरोध केल्यास अथवा हल्ले केल्यास महावितरण कंपनीकडून गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला. महावितरण कंपनी वीज निर्मितीसह इतर खासगी कंपन्यांकडून वीज विकत घेत आहे. महावितरणला विकत घेतलेल्या विजेचे पैसे दरमहा द्यावे लागतात. (Aurangabad News)

वीज निर्मिती कंपन्यांना विकत घेतलेल्या विजेचे पैसे दरमहा अदा न केल्यास वीज विकत घेऊन ग्राहकांना वीज पुरवठा करणे अशक्य होते. म्हणून वीज ग्राहकांना विकलेल्या विजेचे पैसे दरमहा वसूल करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महावितरणकडून थकीत वीज बिल वसूली मोहीम राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी वीज बिल वसुली करताना महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांना विरोध करणे, जमाव जमा करून वसुलीला विरोध करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे, मारहाण करणे, कर्मचाऱ्यांवर खोट्या केसेस करणे आदी प्रकार घडत आहेत. महावितरण प्रशासनाने याबाबीची गंभीर दखल घेवून कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहणार आहे.

हेही वाचा: सावकारांची नावं लिहून तरुणांची आत्महत्या!; पाहा व्हिडिओ

कर्मचाऱ्यांवरही कारवाई

वीज बिल वसुलीला विरोध झाल्यास संबंधितांवर विद्युत कायदा २००३ नुसार कडक कारवाईही करणार आहे. वीज चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. ज्या भागात वीज चोरी मोठ्या प्रमाणात आहे. तेथील वीज चोरीवर नियत्रंण न आणल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवरही महावितरणकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

..तर अंधारात राहण्याची वेळ

काही वीज ग्राहकच दरमहा नियमित वीजबिल भरतात. उर्वरित वीज ग्राहकांनी नियमित वीज बील न भरल्यामुळे महावितरणला वीज बिल वसूलीसाठी मोहीम राबवून थकबाकीदार ग्राहकांचा नाईलाजाने वीज पुरवठा खंडित करावा लागतो. थकबाकीसाठी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाल्यास अंधारात राहण्याची वेळ येवू नये. यासाठी वीज ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

loading image
go to top