
छत्रपती संभाजीनगर : आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिजिलॉकरमध्ये सुरक्षित ठेवून हवे तेव्हा उपलब्ध होतात. केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाइन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली आहेत.