esakal | दौलताबाद किल्ल्याच्या आवारात स्थानिकांचे अतिक्रमण
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad

दौलताबाद किल्ल्याच्या आवारात स्थानिकांचे अतिक्रमण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दौलताबाद किल्ल्यासमोरील गेटजवळ स्थानिक नागरिकांनी दुकाने थाटून जागेचे अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण केलेल्या स्थानिक नागरिकांना ग्रामपंचायत सहकार्य करत असून त्याबद्दल संबंधितांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा दावा पुरातत्व विभागाने केला आहे. दौलताबाद किल्ल्यासमोरील जागा ही पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने ही अतिक्रमणे तात्काळ हटवावीत अशी मागणी बुधवारी (ता.१) पत्रकार परिषदेत भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. मीनलकुमार चावले यांनी केली. (Aurangabad News)

दौलताबाद किल्ला हा राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने पर्यटकांना सुविधांसाठी विकासात्मक कामे सुरू केली आहेत. २००१ ला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळने स्मारकाशी संलग्न असलेली किल्ला समोरील ३.७१ हेक्टर जमीन ही पर्यटकांना सुविधा पुरवण्यासाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बुकिंग काउंटर, पब्लिकेशन काउंटर पार्किंग सुविधेसह सुशोभीकरण, कुंपण, लँडस्केपिंग इत्यादी कामासाठी देण्यात आली आहे.

हेही वाचा: सावकारांची नावं लिहून तरुणांची आत्महत्या!; पाहा व्हिडिओ

स्थानिकांनी लॉकडाऊन काळात तात्पुरती दुकाने उभारून कुंपण केलेल्या परिसरात अतिक्रमण केले आहे. दरम्यान पुरातत्व विभागाच्यावतीने अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले, तेव्हा अतिक्रमण काढण्याऐवजी ग्रामपंचायतील सरपंच यांच्यामार्फत अतिक्रमणधारकांनी या कार्यालयाकडे निवेदन देऊन या जमिनीवर एएसआयने अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली असता याला स्थानिक नागरिकांच्या वतीने जतीय रंग देण्यात आला असल्याचे चावले म्हणाले.

loading image
go to top