

छत्रपती संभाजीनगर : पहाटे जेवणासाठी गेलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला तिघांनी चाकूने भोसकले. शुक्रवारी पहाटे चार वाजता हा प्रकार झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये घडला. संतोष राजूअण्णा पेद्दी (वय २८, रा. रामज्योती बिल्डिंग, उस्मानपुरा) असे मृताचे नाव आहे. मारेकरी पसार झाले असून चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.