फोटो 09 फोटोओळी:अंबड:नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना मागण्याचे निवेदन देताना नागरिक

फोटो 09 फोटोओळी:अंबड:नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना मागण्याचे निवेदन देताना नागरिक
Published on
अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीयांसाठी समान लागू करण्याची मागणी अंबड, ता. ५ (बातमीदार) : अन्नसुरक्षेचे नियम केवळ हिंदू सणांनाच लागू न करता सर्व धर्मीयांसाठी समान पद्धतीने लागू करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे शुक्रवारी (ता. ४) करण्यात आली. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, या नियमांचे स्वागतच आहे, असे निवेदनात म्हटले आहे.मात्र, या संदर्भात केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमधील महाप्रसाद, भंडारा आणि अन्नदान यांचाच विशेष उल्लेख करून परवाने, नोंदणी तसेच कारवाईचा इशारा देणे ही भूमिका पक्षपाती असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षेचे नियम आवश्यक असतील, तर ते धर्म, पंथ किंवा जात असा कोणताही भेद न करता सर्व धर्मीयांच्या अन्नदानासाठी समानपणे लागू करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर श्रीमंतराव शेळके, डॉ. राजेंद्र भाला, रवींद्र अंबिलवादे, जगदीश जोशी, संजय देशमुख, गीताविलास खुंटेफळकर, बाबासाहेब वैराळ, संजय जगधने, कैलास शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com