Sambhaji Nagar
Sambhaji Nagarsakal

Sambhaji Nagar : राज्य मुख्याध्यापक महासंघाची स्थापना ; मुख्याध्यापकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मुख्याध्यापक महासंघाची स्थापना

राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मुख्याध्यापक महासंघाची स्थापना करण्यात आली.
Published on

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मुख्याध्यापक महासंघाची स्थापना करण्यात आली. यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते राज्याध्यक्षपदी युनूस पटेल, तर कार्याध्यक्षपदी प्रा. मनोज पाटील यांची निवड करण्यात आली.

तसेच उपाध्यक्षपदी एस.बी. शिरसाठ (नाशिक), व्ही.एम. भताने (पुणे), राज्य सचिवपदी किरण मास्ट, कोषाध्यक्षपदी उदय देशमुख (नागपूर) यांची एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान, सहा विभागीय अध्यक्ष व सचिव यांचीदेखील निवड करण्यात आली. त्यात मराठवाडा अध्यक्षपदी डी.सी. डुकरे, कार्याध्यक्षपदी बी.बी. नालमवार यांची निवड करण्यात आली.

Sambhaji Nagar
Dharashiv News : धाराशिवमध्ये दोघांना कोठडी ; तलाठी भरती परीक्षा गैरव्यवहार प्रकरण, तिघांवर गुन्हा

तसेच महिला आघाडी राज्य अध्यक्षपदी संध्या काळकर, उपाध्यक्षपदी संजीवनी शेळके (बुलढाणा), तर कार्याध्यक्षपदी छाया मोहितकर यांची निवड झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी सुनील जाधव, उपाध्यक्षपदी सुरेखा शिंदे, सचिवपदी धनपाल खोकड यांची एकमताने निवड करण्यात आली. महिला शहराध्यक्षापदी सुलभा वट्टमवार यांची निवड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com