वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) : महाराष्ट्रातील संतांची भूमी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. "भूत उतरवतो, लग्न करून देतो, अपत्यप्राप्तीसाठी पूजा करतो" अशा आमिषांनी निष्पाप भक्तांची फसवणूक करणाऱ्या संजय रंगनाथ पगारे (Sanjay Pagare Baba) या स्वयंघोषित बाबाच्या अघोरी उपचारपद्धतीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.