
छत्रपती संभाजीनगर : आयकरात बनावट कर वजावट घेणाऱ्यांविरोधात आयकर विभागाने देशभरात सोमवारी (ता.१४) एकाच दिवशी छापे टाकले. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील आसावा ब्रदर्स यांच्यासह सीए, शैक्षणिक संस्था अशा अन्य आस्थापना अशा सहा ठिकाणी छापे टाकले. पहाटे पाचपासून सुरु असलेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली.