Chh. Sambhajinagar: सिल्लोडच्या पोलिस उपनिरीक्षकाला ठार मारण्याची धमकी; बेशिस्त वाहनचालकास समज देताना घटना
Crime News: सिल्लोड शहरातील नीलम चौकात पोलिस उपनिरीक्षकांना गोकूळ निकाळजे कुटुंबाने अश्लील भाषेत धमकावले व शिवीगाळ केली. तपासानंतर संबंधित चौघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्यात आले.
सिल्लोड : कर्तव्यावरील पोलिस उपनिरीक्षकास अश्लील भाषेत शिवीगाळ करून ॲट्रॉसिटी करण्याची धमकी दिली. ही घटना सिल्लोड शहरातील नीलम चौकामध्ये शुक्रवारी (ता. २२) दुपारी दोनच्या सुमारास घडली.